वाहन ट्रान्सफर महत्वाचे मुद्दे मुद्दाम टाकतोय ...!
1. संपूर्ण राज्यात vehicle transfer कोणतीही NOC शिवाय ट्रान्सफर करता येते ..पण बाहेरच्या राज्यात NOC आवश्यक आहे .
2. जो घेतोय तो Buyer कडे योग्य standard ऍड्रेस proof असायलाच हवा , जस स्वतः चे आधार ,लाईट बिल नाहीतर rent agreement .
3. जो विकतोय तो Seller त्याचे आधार ,पॅनकार्ड ,original RC ,insurance ,PUC आणि पेन्सिल ने गिरवलेल्या डोळ्यांनी सहज दिसणाऱ्या CHASSIS PRINTS .
4. जर वाहनावर बोजा म्हणजे कर्ज असेल तर सगळ्यात अगोदर Seller ला त्या त्या RTO मधून त्यावरील बँकेचा बोजा कमी करून नवीन आलेल्या RC वरून पुढील व्यवहार करता येतात .जर buyer RTO आणि SELLER RTO हा सारखाच असेल तर मात्र दोन्ही व्यवहार एकत्र करता येतात .
5. जर ओरिजिनल RC हरवली असेल तर स्टेप चार सारखी प्रोसेस पुन्हा करावी लागेल .
6. सर्वात महत्वाचे ..ऑनलाइन अर्ज /अँप्लिकेशन भरण्यासाठी RC ला मोबाईल नंबर अपडेट असण आवश्यक आहे .त्याशिवाय कोणतंही काम होणार नाही .
7. बऱ्याच RTO जिल्ह्यात Buyer ला स्वतः त्या RTO ला जावंच लागत .सध्या पुण्यात जर वाहन ,वाहन कर्ज/बोजा तीन वर्ष्याच्या आत कमी होत असेल तर Seller ला कार्यालयात यावंच लागत .
8. पूर्वी फॉर्म 29 , 30 हे सहज उपलब्ध होत असत ,आत्ता मात्र हे फॉर्म प्रिंटेड स्वरूपात येतात ,मोबाइल otp घेतल्यावर online माहिती भरून या फॉर्म वर प्रिंटेड Seller Buyer ची सर्व माहिती येते .
9. सह्या ह्या पॅनकार्ड च्या reference वरून कराव्या लागतात ,सहीचा difference अर्ज /अँप्लिकेशन रद्द होतात .
10. संपूर्ण भरलेला फॉर्म / अँप्लिकेशन लगेच त्या त्या RTO कार्यालयात जमा करून दोन तीन आठवड्यातच त्यावर निर्णय लागून स्पीड पोस्टाने Buyer च्या पत्त्यावर कुरिअर पोचतो .
11. जुन्या मालकाच्या नावे असलेला insurance हा कमी खर्चात नवीन मालकाच्या नावावर करता येतो RC भेटल्यावर .
काळजी पूर्वक जुनी वाहन विक्री प्रक्रिया लवकरात लवकर निकाली लावा ...,फक्त सही करून दिली तर Seller जबाबदारीतून मुक्त होत नाही .
खास टीप - ऑनलाइन नोंद Buyer च्या नावावर(m parivahan ऍप वर तपासता येते ) होई पर्यन्त सर्वस्वी Seller जबाबदार असतो ,जर काही घटना घडली ,अपघात झाला तर Seller जबाबदार असतो ...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा