रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

भारतात सोन्याच्या किमती वाढवणारी मुख्य कारणे

📈 भारतात सोन्याच्या किमती वाढवणारी मुख्य कारणे

1. रुपयाची अवमूल्यन (Rupee Depreciation)
भारतात सोन्याचा बहुतांश भाग निर्यातीद्वारे (import) येतो. जागतिक स्तरावर सोन्याची किंमत डॉलरमध्ये असते.
जर रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला, तर त्याच सोन्याच्या एककाची भारतीय रूपयात किंमत वाढते. 

2. जागतिक सोने किंमतीतील वाढ
भारतात स्थानिक किंमत ही जागतिक दरांशी घनिष्ठपणे जोडलेली आहे.
जर COMEX, LBMA इत्यादी बाजारांमध्ये सोन्याची किंमत वाढली, तर ती भारतातही प्रतिबिंबित होते. 

3. महागाईचा दबाव (Inflationary Pressure)
चलनाची किंमत कमी होत असेल किंवा महागाई वाढत असेल, तेव्हा लोक “पैसे धरून ठेवण्याऐवजी” सोन्यात गुंतवतात, ज्यामुळे मागणी वाढते. 

4. उच्च मागणी — सण, विवाह आणि पारंपरिक वापर
भारतात सोन्याचा वापर अगदी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे — विशेषतः दिवाळी, दसर्‍या, लग्नालगतच्या काळात.
या काळात जास्त खरेदी होते, ज्यामुळे किंमत तात्पुरती वाढते. 

5. रेस्ट्रिक्शन्स आणि शुल्क, आयात कर वाढणे
सरकार आणि केंद्रीयबँकेचे चे धोरणही महत्त्वाचे आहे — सोन्यावर आयातीचा शुल्क, शुल्क आणि कर वाढवले तर ती “सीमा शुल्क + कर” किंमत वाढवतात. 

6. केंद्रीय बँका आणि संस्थात्मक खरेदी
काही देशांच्या केंद्रीय बँका किंवा मोठ्या गुंतवणूकदार सोन्याची राखीव खरेदी करतात, ज्यामुळे जागतिक मागणी वाढते आणि त्याचा परिणाम भारतावरही होतो. 

7. जागतिक अनिश्चितता / आर्थिक / राजकीय तणाव
युद्ध, राजकीय तणाव, आर्थिक मंदीचा धोका किंवा बाजारातील अस्थिरता असे घटक असतील, तर गुंतवणूकदार “सुरक्षित ठिकाणी” पैसे हलवतात — आणि त्यात सोने येते. 

8. पूर्व-आयात वाढ (Front-Loading of Imports)
काही वेळेला, सोनेचे दर वाढण्याआधी, ज्वेलर्स किंवा वितरक मोठ्या प्रमाणात आयात करतात (आयात वाढवतात) — त्यामुळे त्या मागणीमुळे दर वाढतात. 

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

नोटरी म्हणजे काय?

नोटरी म्हणजे काय?
नोटरी (Notary Public / शपथपत्र अधिकारी) हा एक अधिकृत अधिकारी असतो ज्याची नियुक्ती सरकार करतं. त्याचं मुख्य काम म्हणजे विविध कायदेशीर कागदपत्रांना प्रमाणित (attest) करणे, साक्षीदार राहणे आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटवणे.

नोटरीचे प्रमुख उपयोग

नोटरीची सेवा खालील बाबींमध्ये घेतली जाते –

1. शपथपत्र (Affidavit) तयार करून देणे व प्रमाणित करणे

उदा. नाव दुरुस्ती, जन्मतारीख दुरुस्ती, पत्ता बदल, शैक्षणिक कागदपत्रे दुरुस्ती.

2. दस्तावेजांची सत्यता प्रमाणित करणे (Attestation)

शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे, परदेशातील वापरासाठी लागणारे दस्तऐवज.

3. करारपत्रे व करारनामे (Agreements & Contracts)

भाडे करार, व्यवसाय करार, कर्ज करार इ.

4. प्रतिज्ञापत्र (Declaration / Undertaking)

उदा. "मी विवाहित/अविवाहित आहे" किंवा "हे माझे स्वतःचे घर आहे" यासारखी विधाने.

5. हक्क त्यागपत्र / अधिकारपत्र (Power of Attorney / Release Deed)

जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला आपले हक्क वापरण्याचा अधिकार देते.

6. व्यवसाय/कंपनी संबंधित कागदपत्रे

पार्टनरशिप डीड, सोसायटी नोंदणी कागदपत्रे इ.

7. परदेशात वापरण्यासाठी कागदपत्रांची तयारी (For Visa, Immigration, Foreign Study, Jobs)

उदा. बँक स्टेटमेंट, शैक्षणिक प्रमाणपत्र, लग्न प्रमाणपत्र यांची नोटरीकृत प्रत.

महत्वाचे मुद्दे

नोटरी फक्त कागदपत्रावर "हा दस्तऐवज अमुक व्यक्तीने माझ्यासमोर सही केली आहे आणि तो खरी आहे" असे प्रमाणित करते.

नोटरी कागदपत्रातील मजकूर खरा आहे की खोटा हे तपासत नाही; ती फक्त सही व ओळख प्रमाणित करते.

प्रत्येक नोटरीकडे सरकारकडून दिलेला नोंदणी क्रमांक व शिक्का (Seal/Stamp) असतो.

👉 सोप्या भाषेत सांगायचं तर, नोटरी ही कागदपत्रांना कायदेशीर मान्यता देणारी अधिकृत शिक्कामोर्तब प्रक्रिया आहे.
नोटरी होण्यासाठी पात्रता (भारतामध्ये)

1. शैक्षणिक पात्रता व अनुभव
अर्जदार वकील असावा.
किमान 10 वर्षे वकीलीचा अनुभव असावा.
अनुसूचित जाती/जमातीतील उमेदवारांसाठी 7 वर्षांचा अनुभव पुरेसा असतो.
शासकीय किंवा अर्धशासकीय सेवेत कायदेशीर अधिकारी/कायदा विषयक अनुभव असेल तरी अर्ज करता येतो.

2. सरकारी मान्यता (Appointment)
अर्जदाराने केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडे अर्ज करावा लागतो.
सरकार अर्ज तपासून त्या वकिलाची पात्रता पाहते.
एकदा पात्रता ठरली की शासन आदेशाने नोटरी म्हणून नेमणूक केली जाते.

3. कालावधी व नोंदणी
एकदा नोटरी झाल्यावर साधारणपणे 5 वर्षांचा कालावधी मिळतो.
त्यानंतर पुन्हा नूतनीकरण (renewal) करावे लागते.

4. अधिकार
नोटरी झाल्यानंतर त्यांना सरकारकडून शिक्का (Seal) आणि नोंदणी क्रमांक (Registration Number) दिला जातो.
याच शिक्क्याला कायदेशीर मान्यता असते.

म्हणजे थोडक्यात
सामान्य व्यक्ती थेट नोटरी होऊ शकत नाही.
फक्त अनुभवी वकिलांना (कायदा व्यवसायिकांना) शासन नोटरीचे अधिकार प्रदान करू शकते.

संकलन - नितिन बागले

रविवार, १३ एप्रिल, २०२५

Train Colour Codes : काही रेल्वे निळ्या, काही लाल आणि काही हिरव्या का असतात? त्याचा अर्थ काय?

या विषयावर मागील आठवड्यात एक लेख प्रिंट मीडियात प्रसारित झाला आहे.

भारतीय रेल्वेचे डबे तीन रंगाचे असतात. काही लाल, काही निळ्या आणि काही हिरव्या रंगाचे डबे आपण पाहिले असतील. यावर पुढील प्रमाणे विश्लेषण केले आहे.

भारतीय रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. भारतात एकूण 12,167 पॅसेंजर ट्रेन्स आणि 7349 मालगाड्या आहेत. भारतीय रेल्वेतून दररोज 23 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. विशेष हा आकडा ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढा आहे!

भारतीय रेल्वेचे डबे तीन रंगाचे असतात. काही लाल, काही निळ्या आणि काही हिरव्या रंगाचे डबे आपण पाहिले असतील. त्याचा अर्थ काय आपल्याकडे याच रंगाचे डबे का असतात, याबद्दल संक्षिप्त माहिती ….
लाल रंगाचा रेल्वे डबा

सध्या लाल रंगाच्या डब्यांची संख्या वाढली आहे. लाल रंगाच्या रेल्वे डब्यांना LHB म्हणजेच Linke Hofmann Busch म्हणतात. हे रेल्वे डबे पंजाबमधील कपूरथला इथे तयार केले जातात. हे डबे तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो. यामुळे हे डबे वजनाने हलके असतात. हे डबे डिस्क ब्रेकसह 200 किमी/ताशी वेगाने चालवता येतात. त्याच्या देखभालीवरही कमी खर्च येतो. अपघात झाल्यास हे डबे एकमेकांच्या वर चढत नाहीत. कारण त्यांच्याकडे सेंटर बफर कुलिंग सिस्टम आहे.

हिरव्या रंगाचे रेल्वेचे डबे

गरीब रथ एक्सप्रेस गाड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. तर मीटरगेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात. नॅरोगेज गाड्यांमध्ये हलक्या रंगाचे डबे वापरले जातात.आता देशातील नॅरोगेज गाड्यां सध्या जवळपास बंद झाल्या आहेत.

निळ्या रंगाचे रेल्वेचे डबे

निळ्या रंगाच्या डब्यांना इंटिग्रल कोच फॅक्टरी कोच म्हणतात. निळ्या डब्यांसह ट्रेनचा वेग 70 ते 140 किमी/ताशी असतो. मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये हे डबे वापरले जातात. इंटिग्रल कोच फॅक्टरी तामिळनाडू इथे आहे. ते तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो. हे डबे जड असतात, त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त असतो. या डब्यांना दर 18 महिन्यांनी ओव्हरहॉल करणं आवश्यक असतं.


गाडीच्या चाकांमध्ये साधी हवा भरणे की नायट्रोजन हवा भरणे चांगले?

हे एक बाजारतंत्र आहे. लोकांना बनवण्याचा एक चाणाक्ष मार्ग शोधलेला आहे.

मुळात आपण हे लक्षात घ्यावे की साध्या हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असतो. त्यामुळे साधी हवा भरली तरी त्यामध्ये बहुतांशी नायट्रोजन असतोच.

नायट्रोजन विमानाच्या टायरमध्ये भरला जातो कारण खुप उंचावर विमान असताना टायरमधील हवेचे गुणधर्म बदलू नयेत तसेच विमान उतरताना प्रचंड वेगामुळे टायरचे तापमान वाढून टायर फुटू नयेत.

आपण गाडी विमान ज्या उंचीवर जाते त्या उंचीवर काही नेत नाही. अन विमान उतरतानाचा प्रचंड वेग तर गाडीला देत नाही.

तसेही भारतात गाडीच्या वेगावर ऐंशी किलोमीटर/ तास चे बंधन आहे आणि या वेगाने गाडी चालवल्यास टायर गरम होण्याची शक्यता कमी आहे. अधून मधून गाडी व चालक दोघांनाही आराम द्यायलाच हवा .

थोडक्यात सर्वसाधारण परिस्थितीत टायरमध्ये साधी हवा वापरणे योग्य आहे. उगीच मायकेल जॅक्सनप्रमाणे शुद्ध वायूची गरज नसते. बाकी मोठेपणा मिरवायचा असेल तर नायट्रोजन भरण्यास हरकत नाही.

शिवकालीन काळात मशालीसाठी कोणते इंधन वापरत?

'मशाल' हा शब्द मूळ अरबी शब्द 'मश्अल्' पासून आलेला आहे. मध्ययुगीन आणि शिवकाळात मशाल हे प्रकाशाचे आणि आगीचे महत्त्वाचे साधन होते. बहुतेक मशाली लाकडी किंवा धातूच्या दांड्याच्या टोकाला एका धातूच्या भांड्यात इंधन ठेवून तयार करत. त्या साधारणतः दीड ते दोन हात लांब असत.

मशाली मुख्यतः चिंधी किंवा कपड्याचा बोळा/गुंडाळा वापरून बनवल्या जात. हे बोळे भांड्यात ठेवून त्यांच्या टोकाला वारंवार तेल (मोहरी/तीळ) ओतले जाई, जेणेकरून मशाल सतत जळती राहील. राळ हे सुध्दा मशालीसाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे इंधन होते. राळ हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे मशाल अधिक काळ पेटती राहायची. कधीकधी प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेले मेण मशालीत इंधन म्हणून वापरले जात असे.  काही मशालींना भांड्याच्या खाली एक उलटी ताटली किंवा छोटी थाळी बसवली जायची, जेणेकरून तेल हातावर ओघळणार नाही. मशाल अधिक तापू नये आणि ती जळून खाली गळू नये म्हणून भांड्याच्या तळाशी थोडी रेती घातली जात असे. इजा होऊ नये, यासाठी हा एक प्रकारचा सुरक्षा उपाय होता.

किल्ले, गढी, वाडे, छावण्या, मंदिराचा गाभारा, धार्मिक कार्यक्रम आणि समारंभ यामध्ये मशालींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. त्याकाळी रात्रपहारा, युद्ध किंवा प्रवासासाठी मशाली खूप आवश्यक असत. कधीकधी मशालींचा उपयोग शत्रूला गुंगारा देण्यासाठी किंवा धोक्याचे संकेत देण्यासाठीही केला जात असे.

लुना गाडी

लुना हे गाडीचे नाव असून ती काइनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे आताच्या काइनेटिक ग्रीन या कंपनीने बनवलेली आहे.

लुना बद्दल थोडक्यात इतिहास:

  • 1972: काइनेटिक इंजिनिअरिंगने लुना नावाने पॅडल असलेले मोपेड बाजारात आणले.
  • 1990 चे दशक: पेट्रोलवर चालणाऱ्या लुना मॉडेल्स लोकप्रिय होती, विशेषतः ग्रामीण भागात.
  • 2000 नंतर: काइनेटिक कंपनीने मोटरसायकल आणि स्कूटर्सकडे लक्ष दिले आणि लुना उत्पादन थांबवले.
  • 2024: काइनेटिक ग्रीन या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने ई-लुना नावाने इलेक्ट्रिक अवतारात लुना पुन्हा आणली.

काइनेटिक ग्रीन ई-लुना ची सध्याची माहिती:

किंमत:

  • ई-लुना एक्स1 – 69990 रुपये
  • ई-लुना एक्स2 – 74990 रुपये

मुख्य वैशिष्ट्ये:

  • बॅटरी क्षमता – 2 kWh लिथियम-आयन
  • रेंज – एका चार्जवर 80 किमी
  • टॉप स्पीड – 50 किमी/तास
  • मोटर – 1.2 kW BLDC हब मोटर
  • चार्जिंग वेळ – 4 तास
  • वजन – 96 किग्रॅ
  • ग्राउंड क्लिअरन्स – 170 मिमी
  • कलर पर्याय – मलबरी रेड, ओशन ब्लू, पर्ल यलो, स्पार्कलिंग ग्रीन, नाईट स्टार ब्लॅक

ई-लुना विविध शहरांमध्ये उपलब्ध आहे, आणि पुणे येथे तिची किंमत सुमारे 76117 रुपये आहे. अधिक माहितीसाठी आणि टेस्ट राइडसाठी जवळच्या काइनेटिक ग्रीन डीलरशी संपर्क साधावा.