उपयुक्त माहिती
रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५
भारतात सोन्याच्या किमती वाढवणारी मुख्य कारणे
मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५
नोटरी म्हणजे काय?
रविवार, १३ एप्रिल, २०२५
Train Colour Codes : काही रेल्वे निळ्या, काही लाल आणि काही हिरव्या का असतात? त्याचा अर्थ काय?
गाडीच्या चाकांमध्ये साधी हवा भरणे की नायट्रोजन हवा भरणे चांगले?
शिवकालीन काळात मशालीसाठी कोणते इंधन वापरत?
'मशाल' हा शब्द मूळ अरबी शब्द 'मश्अल्' पासून आलेला आहे. मध्ययुगीन आणि शिवकाळात मशाल हे प्रकाशाचे आणि आगीचे महत्त्वाचे साधन होते. बहुतेक मशाली लाकडी किंवा धातूच्या दांड्याच्या टोकाला एका धातूच्या भांड्यात इंधन ठेवून तयार करत. त्या साधारणतः दीड ते दोन हात लांब असत.
मशाली मुख्यतः चिंधी किंवा कपड्याचा बोळा/गुंडाळा वापरून बनवल्या जात. हे बोळे भांड्यात ठेवून त्यांच्या टोकाला वारंवार तेल (मोहरी/तीळ) ओतले जाई, जेणेकरून मशाल सतत जळती राहील. राळ हे सुध्दा मशालीसाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे इंधन होते. राळ हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे मशाल अधिक काळ पेटती राहायची. कधीकधी प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेले मेण मशालीत इंधन म्हणून वापरले जात असे. काही मशालींना भांड्याच्या खाली एक उलटी ताटली किंवा छोटी थाळी बसवली जायची, जेणेकरून तेल हातावर ओघळणार नाही. मशाल अधिक तापू नये आणि ती जळून खाली गळू नये म्हणून भांड्याच्या तळाशी थोडी रेती घातली जात असे. इजा होऊ नये, यासाठी हा एक प्रकारचा सुरक्षा उपाय होता.
किल्ले, गढी, वाडे, छावण्या, मंदिराचा गाभारा, धार्मिक कार्यक्रम आणि समारंभ यामध्ये मशालींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. त्याकाळी रात्रपहारा, युद्ध किंवा प्रवासासाठी मशाली खूप आवश्यक असत. कधीकधी मशालींचा उपयोग शत्रूला गुंगारा देण्यासाठी किंवा धोक्याचे संकेत देण्यासाठीही केला जात असे.
लुना गाडी
लुना हे गाडीचे नाव असून ती काइनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे आताच्या काइनेटिक ग्रीन या कंपनीने बनवलेली आहे.
लुना बद्दल थोडक्यात इतिहास:
- 1972: काइनेटिक इंजिनिअरिंगने लुना नावाने पॅडल असलेले मोपेड बाजारात आणले.
- 1990 चे दशक: पेट्रोलवर चालणाऱ्या लुना मॉडेल्स लोकप्रिय होती, विशेषतः ग्रामीण भागात.
- 2000 नंतर: काइनेटिक कंपनीने मोटरसायकल आणि स्कूटर्सकडे लक्ष दिले आणि लुना उत्पादन थांबवले.
- 2024: काइनेटिक ग्रीन या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने ई-लुना नावाने इलेक्ट्रिक अवतारात लुना पुन्हा आणली.
काइनेटिक ग्रीन ई-लुना ची सध्याची माहिती:
किंमत:
- ई-लुना एक्स1 – 69990 रुपये
- ई-लुना एक्स2 – 74990 रुपये
मुख्य वैशिष्ट्ये:
- बॅटरी क्षमता – 2 kWh लिथियम-आयन
- रेंज – एका चार्जवर 80 किमी
- टॉप स्पीड – 50 किमी/तास
- मोटर – 1.2 kW BLDC हब मोटर
- चार्जिंग वेळ – 4 तास
- वजन – 96 किग्रॅ
- ग्राउंड क्लिअरन्स – 170 मिमी
- कलर पर्याय – मलबरी रेड, ओशन ब्लू, पर्ल यलो, स्पार्कलिंग ग्रीन, नाईट स्टार ब्लॅक
ई-लुना विविध शहरांमध्ये उपलब्ध आहे, आणि पुणे येथे तिची किंमत सुमारे 76117 रुपये आहे. अधिक माहितीसाठी आणि टेस्ट राइडसाठी जवळच्या काइनेटिक ग्रीन डीलरशी संपर्क साधावा.